हलगर्जीपणा भोवला! आरोग्य विभागातील १७ अधिकाऱ्यांना नोटिसा, हे आहे कारण


जालनाः ओमिक्रोनचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात लसीकरण मोहिम वेगाने करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या मोहिमेत खीळ बसल्यामुळे जिल्ह्यातील ३ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या काढण्यात आलेल्या नोटिसांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा भोंगळ कारभार या नोटीसीने चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.

ओमिक्रोन जालना जिल्ह्यातही धडकला असून जिल्ह्यातील पहिल्या पेशंटमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारीच याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई करत हलगर्जीपणा असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली.

घर घेण्यासाठी गेलेल्या वकिलाला आधी जात विचारली; अनुसूचित जातीचे असल्याचे सांगताच….

या बाबीची दाखल घेत मंठा अंबड, घनसावंगी येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच गोंदी, शहागड, सुखापुरी, वाकुळणी, सोमठाणा, राजूर, राजा टाकळी, डोंणगाव खासगाव, वरुड, रामनगर, तळणी,ढोकसाळ, पाटोदा या १४ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावत ३ दिवसांत लेखी स्वरूपात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील या प्रकाराने आरोग्य विभागातील दिव्याखालील अंधार पहावयास मिळत आहे.

वाचाः
हरभऱ्यावर घाटे आळीचा प्रादुर्भाव; कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्लाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *