India China: सीमेवर ६० हजार भारतीय सैनिक तैनात, चीनसोबत आज १४ व्या टप्प्यात चर्चा


हायलाइट्स:

  • भारत – चीन दरम्यान १३ बैठकी निष्फळ
  • आज १४ व्या टप्प्यात लष्करी पातळीवर पुन्हा एकदा चर्चा
  • उर्वरित वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रिया सुरू होणार?

बीजिंग, चीन :

भारत आणि चीन दरम्यान बुधवारी १४ व्या टप्प्यात लष्करी पातळीवर चर्चा होतेय. भारताशी लागून असलेल्या सीमावर्ती भागात सद्य परिस्थिती ‘सामान्यत: स्थिर’ असल्याचं मंगळवारी चीननं म्हटलंय. तसंच चीनकडून पूर्व लडाखमधील उर्वरित वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी लष्करी पातळीवरील चर्चेच्या १४ व्या फेरीची पुष्टी करण्यात आली.

‘भारतासोबत वैर नाही’; आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडल्यानंतर पाकिस्तानला सुचला शहाणपणा
श्रीलंकेची आर्थिक कुचंबना; टोमॅटो २०० रुपये तर मिरची ७०० रुपये किलो!

सैन्यमाघारीवर बैठक


पूर्व लडाखमधील काही ठिकाणांबाबत उभय देशांत अद्याप वाद असून, बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर ठोस व सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा भारतीय लष्करातर्फे सोमवारी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वँग वेनबिन यांनी मंगळवारी ही प्रतिक्रिया दिली. पूर्व लडाखच्या काही भागांत असणारा तणाव सर्वसाधारण व नियमित परिस्थितीत रूपांतरित करण्यासाठी भारत सहकार्य करील, अशी आम्हाला आशा आहे, असंही वँग यांनी म्हटलंय.

उभय देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आज (बुधवारी) चर्चेची चौदावी फेरी होत आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूस असणाऱ्या चुशूल-मोल्दो या ठिकाणी ही बैठक होतेय. उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांत यापूर्वी १० ऑक्टोबर, २०२१ रोजी चर्चेची तेरावी फेरी झाली होती. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नव्हतं. ‘आम्ही केलेल्या काही सकारात्मक शिफारसी चीननं मान्य केल्या नाहीत. तसेच, हा तिढा सुटेल असे प्रस्तावही मांडले नाहीत’, अशी नाराजी भारतीय अधिकाऱ्यांनी त्या बैठकीनंतर व्यक्त केली होती.

दोन्ही बाजूंनी जमवाजमव

उभय सैन्यात पँगाँग सरोवर परिसरात झालेल्या हिंसक झटापटीनंतर ५ मे २०२० पासून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर इथंच तळ ठोकून बसले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील या संवेदनशील भागांत दोन्ही सैन्यांचे प्रत्येकी ५० ते ६० हजार जवान तैनात आहेत.

उत्तर कोरियाकडून एका आठवड्यात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी; समुद्रात डागली ‘बॅलिस्टिक मिसाईल’
Kazakhstan Unrest: इंधन दरवाढीवरून कझाकिस्तान पेटलं; रशियाचा हस्तक्षेप… पाहा, काय घडलंय नेमकंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *