माजी आमदाराचा भाजपला रामराम, शरद पवारांसह ४ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार!


म.टा.प्रतिनिधी, परभणी : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला रामराम ठोकलाय. येत्या गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गव्हाणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

विजय गव्हाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी राजसभा खा. श्रीमती फौजिया खान यांनी मेहनत घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्हाणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रम, बैठकांपासून लांब होते. त्यामुळे ते भाजपला सोडचिठ्ठी देतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान , भारतीय जनता पक्षात निष्ठवंतांचे खच्चीकरण होत असल्याचं आरोप गव्हाणे यांनी केला. गेल्या 20 वर्षांपासून गव्हाणे भारतीय जनता पक्षात होते. गव्हाणेंच्या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसाहित, उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिकांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

विजय गव्हाणे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याने परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याची चर्चा आहे. खा फौजिया खान यांनी गव्हाणे यांना पक्षात आणण्यासाठी मोठी मेहनत घेतलीय. आता परभणीत राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी गव्हाणे प्रयत्न करताना दिसून येतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *