हे कसं घडलं? करोनामुळे मृत्यू १ हजार ९८० लोकांचा, मदतीसाठी अर्ज आले ५ हजार


औरंगाबादः करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र यासाठी तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. कारण मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा मदतीसाठी आलेल्या अर्जांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून ही तफावत का वाढली याचा शोध घेऊन पुन्हा अर्जांची फेरतपासणी केली जात आहे.

औरंगाबामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या पाहिली तर मनपा हद्दीत १ हजार ९८० तर, ग्रामीण भागातील १ हजार ६७८ असे, एकूण ३ हजार ६५८ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र मदतीसाठी ५ हजार ३४६ अर्ज आले आहेत. त्यामुळे तब्बल १ हजार ६८८ अर्ज अधिकचे आले. त्यामुळे करोनामुळे झालेल्या मृत्यू आणि आलेल्या अर्जांची मोठी तफावत प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.

वाचाः महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा डीजेच्या तालावर ठेका; करोना नियमांचा विसर

यामुळे अर्जांची संख्या वाढलं..!

शासनाच्या धोरणानुसार करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाला पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे एकाचवेळी मृत्याच्या दोन-दोन वारसांनी मदतीसाठी शासनाकडे वेगवेगळे अर्ज दाखल केले. ज्यामध्ये मृताच्या मुलगा आणि मुलीने, आई आणि मुलगा किंवा मुलींनी एकाचवेळी वेगवेगळे दोन अर्ज दाखल केली होती. ज्यामुळे अर्जांची संख्या वाढली. विशेष म्हणजे एकाच मृत व्यक्तीच्या नावासाठी दोन वेगवेगळ्या अर्ज करणाऱ्या काही लोकांच्या खात्यावर दोन वेगवेगळी पन्नास हजारांची मदतही जमा झाल्याचं समोर आलं आहे.

वाचाः तो नपूंसक… अत्याचार करेल कसा?; आरोपी डॉक्टरला न्यायालयाकडून जामीन
अधिकारी काय म्हणतात…

यावर बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, मृतांच्या वारसांना मदत देताना अर्ज करणाऱ्या वारसदाराचा आधार क्रमांक ग्राह्य धरला जातो. शिवाय यासाठी वापरत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या. पण वारसदाराऐवजी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा आधार क्रमांक ग्राह्य धरला असता तर अशाप्रकारे दोनदा रक्कम जमा झाली नसती.

वाचाः आधी बलात्कार, नंतर गोळ्या देऊन गर्भपात; वेदना होत असतानाही डॉक्टरने केला अमानुष प्रकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *