Muhammad Khorasani: पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद खुरासानी अफगाणिस्तानात ठार


हायलाइट्स:

  • अफगाणिस्तानात खुरासानीचा मृत्यू
  • खुरासानी हा गिलगिट-बाल्टिस्तानचा रहिवासी होता
  • मृत्यू कसा झाला? याबाबत माहिती नाही

इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खालिद बटली उर्फ मोहम्मद खुरासानी याचा अफगाणिस्तानात खात्मा करण्यात आलाय. नंगरहार प्रांतात मोहम्मद खुरासानीचा शेवट झाल्याचं पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मात्र, खुरासानीचा मृत्यू कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मोहम्मद खुरासानी पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना तहरिक ए तालिबान पाकिस्तान (TTP) चा एक वरिष्ठ म्होरक्या होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय मोहम्मद खुरासानी हा टीटीपीचा प्रवक्ताही होता.

पाकिस्तानी नागरिक आणि सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये खुरासानी सक्रीयरित्या सहभागी होता. अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर त्याचे अनेक काबूल दौरे झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
Afghanistan Crisis: तालिबानी मंत्री आणि पंजशीर नेता अहमद मसूद यांची इराणमध्ये भेट?
Kazakhstan Unrest: इंधन दरवाढीवरून कझाकिस्तान पेटलं; रशियाचा हस्तक्षेप… पाहा, काय घडलंय नेमकं
टीटीपी प्रमुख मुफ्ती नूर वली मेहसूद याच्यासोबत संघटनेच्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करत करून दहशतवादी कृत्यांसाठी सक्रीय करण्याचा काम खुरासानीकडून सुरू असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजनाही त्यानं आखली होती. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करण्याची धमकीही त्यानं दिली होती.

गिलगिट-बाल्टिस्तानचा रहिवासी असलेला मोहम्मद खुरासानी हा गेल्या अनेक वर्षांपासून टीटीपीचा ऑपरेशनल कमांडर होता. २००७ मध्ये तो स्वात खोऱ्यातील बंदी घालण्यात आलेल्या ‘तहरिक निफाज शरियत-ए-मुहम्मदी’ या दहशतवादी संघनटनेत सामील झाला. टीटीपीचा माजी गटनेता मुल्ला फजलुल्लाह याच्याशी त्यानं घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुरासानी खैबर पख्तुनख्वाच्या मिरामशाह शहरात एक दहशतवादी अड्डा चालवत होता. मात्र, ऑपरेशन ‘जरब-ए-अजाब’नंतर तो अफगाणिस्तानात पळून गेला होता.

उल्लेखनीय म्हणजे, टीटीपी ही संघटना ‘पाकिस्तानी तालिबान‘ म्हणूनही ओळखली जाते. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर सक्रीय असलेली आणि बंदी घालण्यात आलेली ही एक दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानात आजवर झालेल्या अनेक हल्ल्यांत या संघटनेचा सहभाग होता. या संघटनेकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यासाठी केला जातो.

समुद्रात विशाल बर्फाच्या तुकड्यावर अडकले ३४ जण; पाहा कशी झाली सुटका
अजब-गजब! कब्रस्तानात पार पडलं जोडप्याचं प्री-वेडिंग फोटोशूटSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *