परीक्षेला जाताना तरुणांच्या गाडीला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचा मृत्यूशी संघर्ष


हायलाइट्स:

  • दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात
  • अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू
  • आणखी एक जण जखमी

सातारा : सातारा-कोल्हापूर या महामार्गावर वळसे गावाच्या नजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गोळेवाडी येथील ऋषिकेश गोळे याचा जागीच मृत्यू झाला असून जावळी येथील अविनाश गोळे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Satara Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजताच्या सुमारास उंब्रज येथे आयटीआयची परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. यावेळी झालेल्या अपघातात ऋषिकेश चंद्रकांत गोळे याचा अपघातामध्ये झाला. या घटनेनं गोळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

IND vs SA : केपटाऊनमध्ये कशी आहे भारतीय गोलंदाजांची कामगिरी; कोणी घेतले सर्वाधिक बळी पाहा…

ऋषिकेश हा पाचगणी येथील गोडोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संस्था येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. त्याची परीक्षा उंब्रज येथे आज होती. त्याच्याबरोबर आयटीआयचे शिक्षण घेणारा अविनाश गोळे देखील परीक्षेला जात होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या अपघाताची नोंद महामार्गावरील बोरगाव पोलीस स्थानकामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *