औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची भन्नाट आयडिया; बटण दाबताच गावात चोर आल्याची माहिती मिळणार


औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. अनेकदा चोर गावात येऊन लूटमार करून जातात मात्र, इतर गावातील लोकांना गावात चोर आल्याचं कळत सुध्दा नाही. पण औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आता एक भन्नाट जुगाड करत एका बटणावर गावात चोर आल्याची माहिती गावकऱ्यांना कळणार आहे. यामुळे गावातील लोकं वेळीच जागी होऊन होणारी चोरी थांबवू शकतात.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण हद्दीतील गावात आणि शेत वस्तीवर मोठ्या आवाजात वाजणारे सायरन वाटप केली आहेत. ज्याचं कनेक्शन घरातील स्विचसोबत जोडता येते. त्यामुळे जेव्हा चोर घरात प्रवेश करून सर्वांचे मोबाईल काढून घेतात, त्यावेळी फक्त एकदा बटण दाबलं की सायरन जोरात वाजणार आणि गावातील गावकऱ्यांना तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांना काही तर झालं याचा अंदाज येईल. त्यामुळे ते तात्काळ मदतीला धावून येतील. सद्या प्राथमिक स्थरावर बिडकीन, देवगाव रंगारी आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात हा प्रयोग करण्यात आला असून, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असल्याचं औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक निमित गोयल यांनी म्हटलं आहे.

तर दरोडेखोर तात्काळ पकडले गेले असते…

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील तोंडळी शिवारात सहा ते सात दरोडेखोरांनी एका शेत वस्तीवर दरोडा टाकत उपस्थित महिलांवर बलात्कार सुद्धा केला होता. त्यानंतर तब्बल चार तास दरोडेखोर याच भागात फिरत होते. मात्र पीडित कुटुंबातील लोकांकडे आजूबाजूच्या शेतवस्तीवरील इतर लोकांचे नंबर नव्हते. पण त्याचवेळी जर हाच सायरन वाजवला असता तर दरोडेखोर तात्काळ पकडले गेले असते. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांच्या या नवीन जुगाड आयडियाच कौतुक होत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना फायदाही होतोय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *