मराठवाड्याची राजधानी तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर?; आज तब्बल एवढे रुग्ण सापडले


औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद जिल्ह्याला कोरोना विळखा घालताना पाहायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी ज्या औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ३६ रुग्ण आढळत होते, त्याच औरंगाबादमध्ये आज ३१७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे हा आकडा रोज शंभरने वाढतोय.

औरंगाबाद माहिती कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ३१७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत २७६ रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ४१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ३२ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून ११४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोचिंग क्लासेस बंद.…

औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोव्हिड-19 बाधीत रुग्णांची संख्या आणि ओमीक्रॉनवर पूर्णपणे नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांचा होणारा जमाव कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करत पहिली ते बारावी आणि इतर अभ्यासक्रमाचे खाजगी कोचिंग क्लासेस १० जानेवारी पासून १५ फेब्रुवारीपर्यंत करण्याचे आदेश देण्यात येत आहे.

अशी वाढली रुग्ण संख्या

०१ जानेवारी : २६ रुग्ण
०२ जानेवारी : ३५ रुग्ण
०३ जानेवारी : ३७ रुग्ण
०४ जानेवारी : १०३ रुग्ण
०५ जानेवारी : १२० रुग्ण
०६ जानेवारी : १२८ रुग्ण
०७ जानेवारी : १८३ रुग्ण
०८ जानेवारी : १६२ रुग्ण
०९ जानेवारी : २३४ रुग्ण
१० जानेवारी : ३१७ रुग्णSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *