आधी बायकोचा गळा दाबला, मग स्वत:ही गळफास घेतला, शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल


म.टा.प्रतिनिधी, परभणी : कर्जबाजारीने कंटाळलेल्या पालमच्या एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आधी बायकोचा गळा दाबून तिला जिवंत मारलं आणि नंतर त्यानेही गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

परभणीच्या पालम तालुक्यातील पूयणी या गावात 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ शिंदे यांनी कर्जबाजारीपनेला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

निसर्गाच्या अवकृपेने यंदा सोयाबीन, तूर आणि मूग हातातून गेली. त्यात बँकेचे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत रंगनाथ यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम आपली पत्नी सविता रंगनाथ शिंदे (वय 36) या गाढ झोपेत असताना त्याचा गळा दाबून हत्या केली. नंतर सुताच्या दोरीने लाकडी तुळस दोरी बांधून स्वतःची जीवन यात्रा संपवली.

रंगनाथ शिंदे यांना चार एकर जमीन असून, त्यांच्या पश्चात दोन मुले आहे. दरम्यान, पालम पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पालम पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून डॉक्टरचा अहवाल आल्यावर पुढील तपास केला जाणार आहे.

दरम्यान, घडलेल्या घटनेने मात्र पूयणी गावासह तालुक्यात शोककळा पासरलीय. रंगनाथ शिंदे यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, अशा भवना पंचक्रोशीत व्यक्त होत आहेत तसंच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *