अजब-गजब! कब्रस्तानात पार पडलं जोडप्याचं प्री-वेडिंग फोटोशूट


बँकॉक, थायलंड :

विवाहाअगोदर केलं जाणारं प्री-वेडिंग फोटोशूट सध्या जगभरात ट्रेन्डिंगवर आहे. आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत चांगले फोटो काढण्यासाठी, आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी आपल्या गाठिशी राहाव्यात यासाठी वेगवेगळे जोडपे वेगवेगळ्या युक्त्या काढत आपली प्री-वेडिंग फोटोशूट प्लान करतात. परंतु, असंच एक अजब-गजब प्री-वेडिंग फोटोशूट करणारं एक जोडपं सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय… कारण, या जोडप्याच्या फोटोशूटची थीम होती ‘अंत्यसंस्कार‘!

अंत्यसंस्कार या थीमवर फोटो काढण्यासाठी मग होणारे वधू-वर ताबूतात बसलेल्या अवस्थेत दिसले. थायलंडचा ३२ वर्षीय ग्राफिक्स डिझायनर नॉन्स कोंगचॉ आणि त्याच्या गर्लफ्रेंडनं गेल्या गुरुवारी आपले काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले.
Watch Video : तलावात विहार करणाऱ्या बोटींवर अचानक कोसळला डोंगराचा कडा!
न्यूयॉर्कमध्ये इमारतीला आग! नऊ मुलांसहीत १९ जणांचा मृत्यू
या फोटोंमध्ये सिल्व्हर रंगाचा सूट परिधान करून नॉन्स आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका कब्रस्तानात वेगवेगळ्या ठिकाणी पोझ देताना पाहायला मिळतोय. त्याच्या गर्लफ्रेंडनं विवाहप्रसंगी परिधान करतात असा सफेद रंगाचा गाऊन परिधान केला होता. एका फोटोत ‘मॅरी मी’ असं लिहिलेल्या खांबाजवळ हे जोडपं कब्रस्तानात उभं राहिलेलं दिसून येतंय.

यातील एका फोटोत नॉन्स ताबूतात झोपलेल्या अवस्थेत दिसतोय तर त्याची गर्लफ्रेंड सिल्कच्या कव्हरला बंद करताना दिसतेय. तिच्या हातात एक पुष्पगुच्छही आहे.

हे फोटो केवळ भीतीदायकच नाही तर अशी आयडिया या जोडप्याच्या डोक्यात कुठून आली असावी बरं? असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण करणारे आहेत.

सोशल मीडियावर अनेक युझर्सनं उघडपणे या जोडप्याच्या या अजब युक्तीवर टीका केलीय तर काहींनी या जोडप्याचं कौतुकही केलंय.

New Corona Variant: धोक्याची घंटा! डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र; ‘डेल्टाक्रॉन’चा जन्म
घटस्फोटानंतर पाळीव कुत्रा-मांजर कुणाकडे जाणार, स्पेनमध्ये नवीन कायदाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *