Watch Video : तलावात विहार करणाऱ्या बोटींवर अचानक कोसळला डोंगराचा कडा!


हायलाइट्स:

  • ‘मिनासच्या समुद्रातील’ घटना
  • बोटींवर कोसळला डोंगराचा कडा
  • अंगाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

ब्रासिलिया, ब्राझील :

मृत्यू कुणाला कसा गाठणार? हे कुणीही सांगू शकत नाही. अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडलीय. ब्राझीलच्या एका तलावात आनंदानं विहार करणाऱ्या काही बोटींवर डोंगराचा कडा अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास सहा जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

कशी घडली घटना?

ब्राझिलमधील फर्नेस तलावात बोट राईड घेण्यासाठी अनेक पर्यटक इथे दाखल झाले होते. मात्र, याचवेळेस उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यालगतच्या डोंगराचा एक मोठा कडा पाहता-पाहताच खाली कोसळला. या कड्याखाली अनेक बोटीही सापडल्या. सो जोस दा बारा आणि कॅपिटोलियो या शहरांदरम्यान हा अपघात घडला.

मिनास गेराइस राज्य अग्निशमन विभागाचे कमांडर एडगार्ड एस्टेव्हो यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जवळपास ३२ लोक जखमी झालेत. यापैंकी बहुतेकांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

न्यूयॉर्कमध्ये इमारतीला आग! नऊ मुलांसहीत १९ जणांचा मृत्यू
New Corona Variant: धोक्याची घंटा! डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र; ‘डेल्टाक्रॉन’चा जन्म
पावसामुळे खडक कमकुवत

मिनास गेराइस स्टेट प्रेस ऑफिसनं ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पीडित बेपत्तांच्या शोधार्थ अग्निशमन विभागाकडून पाणबुडे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

राज्याचे राज्यपाल रोमू झेमा यांनी सोशल मीडियावर पीडितांसाठी एक संदेश धाडलाय. फर्नेस तलावाला ‘मिनासचा समुद्र‘ म्हणून ओळखलं जातं. साओ पाउलोच्या उत्तरेस जवळपास ४२० किमी परिसरातील हा भाग पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.

राज्य नागरी संरक्षणानुसार, मिनास गेराइस राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे आलेल्या पुरात जवळपास १७ हजार नागरिक बेघर झाले आहेत. सततच्या पावसामुळे डोंगराचा खडक कमकुवत होऊन ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बचावकार्यात मदत करणाऱ्या ब्राझीलच्या नौदलानंही या घटनेमागच्या कारणांचा तपास करणार असल्याचं म्हटलंय.

घटस्फोटानंतर पाळीव कुत्रा-मांजर कुणाकडे जाणार, स्पेनमध्ये नवीन कायदा
Kazakhstan Unrest: इंधन दरवाढीवरून कझाकिस्तान पेटलं; रशियाचा हस्तक्षेप… पाहा, काय घडलंय नेमकंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *