भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याचे निमित्त झाले आणि शेजाऱ्यांमध्ये असे भांडण पेटले की…


पुणे: भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले म्हणून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले आणि या प्रकरणात सोनसाखळी देखील गहाळ झाली. पुण्यातील चंदननगर परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दीप्ती राऊत (वय ३५, खराडी) यांनी तक्रार दिली असून श्वेता थोरात (वय ३७) तृप्ती माने (खराडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीप्ती या घराजवळ भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेल्या असता श्वेता तेथे आल्या. त्यांनी दीप्ती यांना जाब विचारला. ‘तू या कुत्र्यांना खाऊ घालतेस आणि ते माझ्या घरासमोर येऊन घाण करतात’ असे म्हणत हातातला दगड दीप्तीच्या पाठीवर मारून फेकला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. श्वेता हिची बहीण तृप्ती हिने सुद्धा धमकी दिली.

या प्रकरणी श्वेता यांनी पोलिसांत तक्रार केली. त्याचा राग आल्याने दीत्नी यांनी श्वेताला पुन्हा गाठले आणि पोलिसात तक्रार का केली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. श्वेता यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली आणि लाकडी काठीने जबर मारहाण करत दगडाने हात पाय तोडेन, अशी धमकी दिली. या विरुद्ध दीप्ती दिलीप राऊत, पुष्पा दिलीप राऊत, दीपक राऊत व दीपक राऊतची पत्नी संतोष खाटोड अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणात दोन्ही कुटुंबातील एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *