न्यूयॉर्कमध्ये इमारतीला आग! नऊ मुलांसहीत १९ जणांचा मृत्यू


हायलाइट्स:

  • गेल्या ३० वर्षांतली सर्वात भयंकर घटना
  • न्यूयॉर्कमध्ये १९ मजल्यांच्या इमारतीला आग
  • खराब हीटरमुळे इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या मजल्याला आग

न्यूयॉर्क, अमेरिका :

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या ब्रोंक्स भागातील एका १९ मजली इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल १९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. मृतांमध्ये तब्बल नऊ लहानग्यांचाही समावेश आहे. या घटनेकडे गेल्या ३० वर्षांतील न्यूयॉर्क शहरातील सर्वात भयंकर घटना म्हणून पाहिलं जातंय.

एका बिघाड झालेल्या हिटरमुळे १९ मजल्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. मात्र, काही वेळातच ही आग वरच्या आणि खालच्या मजल्यांवरही पसरली… आणि संपूर्ण इमारत धुरानं भरली.

न्यूयॉर्क अग्निशमन विभागाचे (FDNY) आयुक्त डॅनियल निग्रो यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, आगीत इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला जळून खाक झाला आहे. या घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक लोक गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळले.

New Corona Variant: धोक्याची घंटा! डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र; ‘डेल्टाक्रॉन’चा जन्म
Artificial Sun: चीनच्या ‘कृत्रिम सूर्याचा’ ऊर्जा निर्मितीचा नवा रेकॉर्ड; जगाच्या चिंतेत भर!
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर एरिक अॅडम्स, गव्हर्नर कॅथी हॉचुल आणि अमेरिकन सिनेटर चार्ल्स शुमर घटनास्थळी दाखल झाले होते. महापौर अॅडम्स यांचे वरिष्ठ सल्लागार स्टीफन रिंगेल यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली.

अपघातात जीव गमावलेल्या मुलांचं वय १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच १३ जण रुग्णालयात दाखल असून बहुतेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांनी दिलीय. पेटलेल्या इमारतीत अडकून पडल्यानंतर अनेकांना श्वसनाचा त्रास झाला.

या भयंकर घटनेची माहिती देताना मेयर अॅडम्स यांनी आपला अनुभव व्यक्त केला. ‘आधुनिक काळातील आगीची ही एक अत्यंत भयंकर घटनांपैंकी एक घटना आहे. अग्निशमनदलाच्या जवानांना जवळपास प्रत्येक मजल्यावर पीडित आढळून आले. यांत काहींना हृदयविकाराचा झटका बसला होता तर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता’

रविवारी सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळपास २०० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे रवान करण्यात आल्या होत्या.

Kazakhstan Unrest: इंधन दरवाढीवरून कझाकिस्तान पेटलं; रशियाचा हस्तक्षेप… पाहा, काय घडलंय नेमकं
Watch Video: हेलिकॉप्टर उडवण्याची ‘तालिबानी’ पद्धत पाहिलीत का?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *