आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करला आजपासून बूस्टर डोस, रात्रीचंही लसीकरण…


औरंगाबाद : करोनाचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिक आणि व्याघी असलेल्यांना १० जानेवारीपासून तिसरा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मराठवाड्यात ८७ हजार लसवंतांना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० जानेवारीपासून ही लस देण्यास सुरुवात होणार आहे.

सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करसह इतर पात्र नागरिकांना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार ४९४ आरोग्य कर्मचारी, १३ हजार ८०८ फ्रंटलाइन वर्करला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.

याचप्रमाणे मराठवाड्यातील ३२ हजार ५९५ फ्रंटलाइन वर्कर आणि ५४ हजार ९५८ हेल्थ वर्कर्स यांना तिसरा डोस देण्यात येणार आहे. डोस घेण्यासाठी डोस घेतलेल्या तारखेपासून ९ महिने ( ३९ ) आठवडे होणे बंधनकारक आहे.

शिक्षकाने केला २२१९ किलोमीटरचा सायकल प्रवास, कारण वाचून तुम्हीही कराल सलाम

रात्रीचंही लसीकरण…

देशासह राज्य तिसरे लाटेच्या उंबरठ्यावर असताना सरकारकडून लसीकरण करण्यासाठी विशेष सूचना देण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरात लसीकरणाची आकडेवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रात्रीचंही लसीकरण केले जात आहे.

शहरातील कैसर कॉलनी, मेल्ट्रॉन हॉस्पिटल, सिडको एन-८ आरोग्य केंद्र, सिल्कमिल कॉलनी, घाटी, जिल्हा रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय, युनायटेड सिग्मा रुग्णालय, सनशाइन मल्टिस्पेशालिटी, अजिंठा हॉस्पिटल, हडको कार्नर या ठिकाणी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा स्फोट; ७ दिवसात ६ पटीने रुग्ण संख्या वाढली, आता….Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *