अवकाळी पाऊस, गारपिटीने प्रचंड नुकसान, मंत्री बच्चू कडू शेतकऱ्याच्या बांधावर


अमरावती: कालपासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक तुरीचे पीक शेतकरी काढण्याच्या तयारीत होते. अश्या परिस्थितीत हवामान बदले कडाक्याच्या थंडीचे रूप अवकाळी पावसात दाखल झाले. गारपीटीका सुरूवात झाल्याने शेतकरी हवादील झाला. शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या मतदार संघातील नुकसान झालेल्या राजुरा, अडगाव, बेलोरा याठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तलाठी, कृषिअधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांना तातडीने पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. तसेच तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका. मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत संबंधित विभागाचे अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *