काय, दारुची दुकानंही बंद होणार? आरोग्यमंत्र्यांनी दिला तळीरामांना इशारा


जालना : राज्यात करोनाच्या धोक्यामुळे आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात आता दारुची दुकानही बंद करावी लागणार असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात करोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, शाळाही बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना दिसत आहेत.

No Lockdown In Maharashtra : राज्यात लॉकडाऊन होणार नाही? आज लागलेल्या निर्बंधांनंतर राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
यामुळे गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हंटलं आहे. राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असंही त्यांनी सांगितलं. १८ वर्षांवरील करोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी icmr ने याबाबतीत सूचना कराव्या त्याची अंमलबजावणी केली जाईल असही ते म्हणाले.

ST Strike Update : आता महामंडळाचा संयम सुटला, संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *