नवनिर्माणाधीन पार्श्व पद्मावती धाम नागेंद्र जैन मंदिराच्या उभारणीचे काम वेगात

नागदेवतेच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार

बारमेर /धोरिमण्णा प्रतिनिधी- विमल बोथरा : नागेंद्र जैन मंदिराचे काम वेगाने सुरू असून, आपल्या द्रव्याचा योग्य वापर करून पुण्यलाभ घ्यावा , असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

पू.पूज्य गुरुदेव श्री जिनमनोग्यसुरीश्‍वर जी यांच्या प्रेरणेने ब्रह्मसार तीर्थाजवळील नवनिर्माणाधीन पार्श्व पद्मावती धाम नागेंद्र जैन मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत जिनालयाच्या भव्य उत्तंग शिखराचे व इतर घुमटांचे काम जवळपास पूर्ण होत आहे. नागदेवतेच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे, नागदेवतेची उंची सुमारे 68 फूट आणि नागदेवतेच्या फणाची रुंदी सुमारे 30 फूट असेल. इतके भव्य मंदिर संपूर्ण भारतात नाही. आपण सहकुटुंब दर्शनासाठी येवून , पुण्यलाभ घ्यावा असे आवाहन नागेंद्र जैन मंदिराचे ट्रस्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *