Assembly Election 2022: राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान; ‘या’ तारखेपर्यंत जाहीर सभांना परवानगी नाही!


हायलाइट्स:

  • अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखांची घोषणा
  • सात टप्प्यांमध्ये मतदान होणार
  • राजकीय पक्षांना आयोगाकडून अनेक बंधने घालण्यात आली

नवी दिल्ली : देशभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पाच राज्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जाहीर होणार की पुढे ढकलल्या जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आज अखेर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून १० फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. तसंच १० मार्च रोजी या सर्व राज्यांतील मतमोजणी होणार आहे. (Assembly Election Date In 5 States)

या निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरीही करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना आयोगाकडून अनेक बंधने घालण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री हे अजून हॉलिडे मूडमध्येच; भाजपच्या ‘या’ महिला नेत्या कडाडल्या!

कोणती बंधने पाळावी लागणार?

पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असणार आहे. तसंच १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांनाही मनाई करण्यात आली आहे. सभा होणार नसल्याने नेत्यांनी व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच विजयानंतर रॅली काढता येणार नाही आणि विजयी झाल्यानंतर उमेदवाराचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे.

आम्ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेय, आता निर्बंध लावायचे की नाही तेच ठरवतील: राजेश टोपे

या निवडणुकांमध्ये रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटणाऱ्या राजकीय नेत्यांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी मतदान ?

पाच राज्यांतील तब्बल ६९० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील ४०३, गोव्यातील ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७० आणि उत्तराखंडमधील ७० जागांचा समावेश असणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *