पुण्यात धक्कादायक घटना; १० वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल


हायलाइट्स:

  • दहावीत शिकणाऱ्या मुलाने केली आत्महत्या
  • शुक्रवारी रात्री घटना उघडकीस
  • पोलिसांकडून तपास सुरू

पुणे : कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या दहावी इयत्तेतील मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Suicide Case) शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे. आदी अमित कर्वे (वय १५, रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. या मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी, त्याचे आई-वडील व बहीण असे चौघेजण काकडे सिटी परिसरात राहतात. आदीचे वडील एका खासगी बॅंकेत नोकरीस आहेत, तर आई एका शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहीण महाविद्यालयात शिक्षण घेते. आदी जवळच्याच एका शाळेमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता.

Assembly Election: उत्तर प्रदेशसह पाच राज्ये कुणाची?; सात टप्प्यांत मतदान; ‘या’ तारखेला फैसला

शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी आदीची बहीण घरी आली, त्यावेळी तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचं आढळून आलं. तिने याबाबत तत्काळ आई-वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री हे अजून हॉलिडे मूडमध्येच; भाजपच्या ‘या’ महिला नेत्या कडाडल्या!

दरम्यान, याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. आदीने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वारजे पोलीस तपास करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *