दहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकवण्याचा प्रयत्न; गुराख्यांना संशय आला आणि…


महेश महाले । नाशिक

दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी येथील जंगलात एका चिमुकलीला अज्ञात इसमाकडून मारण्याच्या इराद्याने फासावर लटकवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( दि. ७ ) दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान काही गुराखी नेहमीप्रमाणे आपली गुरे चारत असताना जंगलातील झुडपात काही तरी आवाज व झटापट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एखादे जंगली जनावर असावे असे त्यांना वाटले, परंतु नंतर संशय आल्याने जवळ जाऊन पाहणी केली असता एक अज्ञात व्यक्ती अल्पवयीन मुलीला फासावर लटकवून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. गुराख्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाट झाडीचा फायदा घेऊन तो पळून गेला. त्यानंतर गुराख्यांनी पीडित मुलीला तात्काळ खाली उतरवत नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

वाचा: चिंता वाढली! नगर जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येत एकाच दिवसात ‘एवढी’ भर

मुलीचा बापच निघाला आरोपी

मुलीला फासावर लटकवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलीच्या बापानेच तिला फाशी देण्याचा प्रयत्न केला. मुलगी नकोशी झाल्यानं जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा प्रयत्न या नराधम बापाने केला आहे. मुलगी गायब झाल्याची फिर्याद आरोपीनेच दिली होती आणि पोलिसांच्या तपासात हा फिर्यादी बापच आरोपी निघाला. मुलीच्या जबाबानंतर आणि घरात सापडलेल्या पुराव्यावरून मुलीचा बापच आरोपी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. मुलीवरून आरोपीचे त्याच्या पत्नीमध्ये कायम वाद होत होते. दोन दिवसापूर्वीच टोकाचं भांडण झाल्यानं बायको घर सोडून गेली होती. त्यानंतर या नराधमानं मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

वाचा: सरपंच परमीट रूम, उपसरपंच हॉटेल… अशा नावांना हरकत; मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *