छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी करोनाचा शिरकाव; २२ जण पॉझिटिव्ह


हायलाइट्स:

  • छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी करोनाचा शिरकाव.
  • रामटेकमधील तब्बल २२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण.
  • ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता.

मुंबई: राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून काल राज्यात दिवसभरात ३६ हजारांहून अधिक नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यावेळी करोनाची लागण झपाट्याने होताना दिसत असून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानातही करोनाने शिरकाव केला आहे. भुजबळ यांच्या निवासस्थानातील अनेकजणांना करोनाची लागण झाली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील रामटेक या निवासस्थानी असेलल्या एकूण २२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. रामटेकवर गेली दोन दिवस करोनाची तपासणी हाती घेण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेतल्या जात असून काहींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्रथम रामटेकवर ११ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अजूनही या निवासस्थानातील इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. तर चाचण्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी असून रामटेकमधील बाधितांची संख्या वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईच्या लोकलमधून फिरताहेत करोना सुपर स्प्रेडर, धोक्याची घंटा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर निघत होते. भुजबळ नाशिकमधील येवले येथील विविध विकासकामांचा शुभारंभ करणार होते. भुजबळ यांनी काल नाशिकला घेतलेल्या बैठकीत उपस्थित असलेले सिव्हिल सर्जनना करोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे भुजबळ यांनी आपला नाशिक दौरा तूर्तास रद्द केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत मिनी लॉकडाउनची दाट शक्यता; नवीन नियमावली लवकरच…

राज्यात करोनाचा उद्रेक

दरम्यान, राज्यात काल करोनाची मोठी वाढ झाली असून दिवसभरात ३६ हजार २६५ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, असे असले तरी काल दिवसभरात राज्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, दिवसभरात एकूण ८ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच राज्यात काल ओमिक्रॉनच्या एकूण ७९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत अमित शाह यांनी उत्तर द्यावे ;नाना पटोले यांची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *