अभिजीत पाटलांनी पंढरपूरात स्वखर्चाने उभारले DVP थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल

अभिजीत पाटलांनी पंढरपूरात स्वखर्चाने उभारले DVP थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल Abhijeet Patil built covid Hospital in Pandharpur at his own expense in DVP Theater
     पंढरपूर 03/05/2021 - सध्या राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळून येत आहेत.यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक व लक्षणीय आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत आहे. 

        अशा आणीबाणीच्या काळात धारशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारून ५० रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे.

  यामध्ये ५० बेडला ॲक्सिजनची सोय असेल, मेडिकल,लॅब,२४ तास तज्ञ डॅाक्टरांकडून उपचार, नर्स, स्वच्छता, पेशन्टच्या आहाराची सोय यामुळे रुग्णांना आणि त्यांचे नातेवाईक यांना याचा मोठा  फायदा होणार आहे. 

आम्हाला बेड मिळेल का ? म्हणून अनेकजण भेटायला येत तसेच अनेकांचे कॉल येत.सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील हाॅस्पिटलांशी संपर्क करून शक्य तितक्या रुग्णालयांची बेडची व्यवस्था करून देत होतो मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याने सर्वांना बेड मिळवून देणे शक्य होणार नव्हते मात्र गरजू रुग्णांचे होणारे हाल पाहवत नव्हते.याच जाणिवेतून आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो यासाठी मी हे रुग्णालय सुरू करून लोकांच्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्याला शक्य असेल तेवढी मदत सर्वांनी करायला अशा काळात करणे गरजेचे आहे – चेअरमन अभिजीत पाटील, डिव्हिपी उद्योग समूह

चेअरमन अभिजीत पाटील

सध्या ह्या दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली आहे.आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे हॅास्पिटल उपलब्ध होत नसल्याने दगावत आहेत.त्यामुळे तातडीने उपचारासाठी अधिक रुग्णालये उभारणीची गरज निर्माण झाली असताना अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड रुग्णालय उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.गतवर्षीच्या कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून सर्वप्रकारची मदत करत अभिजीत पाटील यांनी आपले सामाजिक भान जपले आहे. गेल्या वर्षात कोरोना काळात पोलीस,आरोग्य कर्मचारी तसेच पत्रकार बांधवांना , कोरोना योध्यांना मोफत जेवण,विविध गरजू घटकांना वस्तू वाटप केले.घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग करीत होते,मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह अनेक प्रकारे अभिजीत पाटील यांनी मदत केली आहे. दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयांची ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली आहे.त्यासोबतच त्यांनी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून गरजू रुग्णांना अडचणीच्या काळात मोठा आधार दिल्याने लोक सेवेसाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून गरजू रुग्णांना अडचणीच्या काळात दिला मोठा आधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: