एसटीला वेठीस धरु नका, अघोषित संपकऱ्यांवर कारवाई होणार; अनिल परबांचा इशारा


उस्मानाबादः आमचे एसटी कामगारबद्दल दायित्व आहे. तसेच दायित्व महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. एसटी कामगार ऐकत नसतील तर पर्यायी व्यवस्था करावीच लागेल. ज्या कामगारांवर कारवाई करण्यात आली ती मागे घेण्याचा प्रश्न येत नाही,करण एसटीचे प्रचंड नुकसान झाले असून प्रशासन हातावर हात ठेवून बसू शकत नाही. म्हणून आशा अघोषित आणि बेकायदेशीर संपावर कारवाई तर होणार, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

राज्यात मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. तर, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडित काढण्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा पुकारला आहे. तर, मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. ते आज श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबासह तुळजापूर येथे आले होते. त्यावेळी संपावर असलेल्या एसटी महामंडळच्या कामगारांवर परिवहन विभागाने बडतर्फ करण्याची कारवाई कालपासून सुरू केली आहे त्यावर बोलताना अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचाः राज्याची करोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल?; आरोग्यमंत्र्यांनी दिला धोक्याचा इशारा

संपावर असलेल्या कामगारांनी सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितली आहे यावर बोलताना आपली मागणी खंबीरपणे लावून धरा तो तुमचा हक्क आहे पण एसटीला वेठीस धरून नको आपल्या मागण्यासाठी आम्ही कधीही लढू नका म्हटले नाही लढण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत परंतु ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरून हा संप चालू नये असं आमचे म्हणणं आहे, असंपरिवहन मंत्री यांनी यावेळी सांगितले. तसंच, आपले जीवन संपवून कुटुंब उघड्यावर पडते त्यामुळे अस करू नये, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

वाचाः आजोबांना आणायला गेलेल्या नातवाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यूSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *