भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या सरचिटणीसपदी अनुप शहा

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या सरचिटणीसपदी अनुप शहा Anup Shah as BJP General Secretary of Maharashtra Pradesh Minority Front

फलटण ,जि.सातारा – माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ सहकारी फलटण नगर पालिकेचे नगरसेवक अनुप शहा यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन राज्याचे अध्यक्ष इजाज देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या सरचिटणीसपदी नेमणूक केली आहे . अनुप शहा हे उत्तम संघटक असून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे . सातत्याने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम ते करत आहेत .त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांची प्रदेश कार्यकारणीकडे शिफारस केली होती, अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली .

     या निवडीबद्दल अनुप शहा यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर , विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर , तालुकाध्यक्ष बजरंग गावडे , शहराध्यक्ष अमोल सस्ते , गटनेते अशोकराव जाधव , नगरसेवक सचिन अहिवळे , युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर ,डॉक्टर प्रविण आगावणे, युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे , भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव ,अध्यक्ष उषा राऊत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: