वर्ध्यात कोरोना रुग्णसंख्येची अर्धशतकाकडे वाटचाल, आता काळजी घेण्याची गरज!


वर्धा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वत्र शिरकाव केल्यानंतर वर्ध्यातही कोरोनाची रुग्णसंख्या आता वाढायला लागली आहे. काही दिवसांपासून बोटावर मोजन्या इतकी असलेली अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अर्धशतकाकडे झेपावत आहे.

बुधवारी एकाच दिवशी १४ रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी पुन्हा २२ रुग्णांनी त्यामध्ये भर घातली. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता बिनधास्त न राहता पुन्हा कोरोना नियमावलीचे काटेकारपणे पालन करण्याची गरज आहे.

या महिन्यातील रुग्णसंख्या

दिवस चाचण्या रुग्ण अ‍ॅक्टिव्ह
१ जानेवारी ३३६ १ ७
२ जानेवारी ३७० ०४ १०
३ जानेवारी १०० ०० ०९
४ जानेवारी ४१५ ०० ०८
५ जानेवारी ६३६ १४ २२
६ जानेवारी ५३१ २१ ४३

नो मास्क नो एन्ट्री

दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्वत्र शिथिलता देऊन जनजीवन सुरळीत सुरु झाले होते. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाही नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करुन बिनधास्तपणे वागणे सुरु केले. तोंडावरचा मास्क हनुवटीवर आला. त्यानंतर तो खिशात गेला. दरम्यानच्या काळात दिसेनासाच झाला होता. पण, आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागल्याने शासनाने कठोर निर्बंध लादले आहे. यामुळे आता मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सोबतच शासकीय कार्यालयातही ‘नो मास्क, नो एन्ट्री’ ची कार्यवाही केली जात आहे.

लसीकरणावर एक नजर

दिनांक वयोगट १५ ते १७ वयोगट १८ ते ४४
३ जानेवारी २०३५ २६३५
४ जानेवारी ९६६ १८७८
५ जानेवारी ६८२ १९०२
६ जानेवारी ५१८ २१९१Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *