कालीचरणचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत रवानगी!


हायलाइट्स:

  • कालीचरण याला न्यायालयीन कोठडी
  • तुरुंगातील मुक्काम वाढला
  • शुक्रवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी

पुणे : दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे भडकाऊ व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग याला न्यायालयाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Kalicharan Maharaj Latest News)

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातुबाग मैदानावर आयोजित ‘ शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावल्या जातील, या पद्धतीने त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करून, दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असं भडकावू व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दंगलीने घेतला बळी; जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू

या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी बुधवारी रायपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कालीचरणला ताब्यात घेतलं होतं. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांच्या न्यायालयाने कालीचरणला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर कालीचरणला पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. कालीचरणला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली.

कालीचरणतर्फे अॅड. अमोल डांगे यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने कालीचरणला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, कालीचरणतर्फे अॅड. अमोल डांगे यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्यास सांगितलं आहे. पोलिसांचे म्हणणे सादर झाल्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *