औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन निर्बंध लागू, वाचा काय आहेत नवे नियम?


औरंगाबाद : करोना रुग्णांची वाढ लक्षात घेता, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी घेतला. सायंकाळी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. दरम्यान, हुरडा पार्टीवर बंदी, लसीकरण आणि मास्कशिवाय पेट्रोल नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या १,८७५ वाहनचालकांचा परवाना आरटीओने रद्द केला असून यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार आहे.

हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सभा, कार्यक्रम, हॉटेल तसेच रिसॉर्टमधील गर्दीचे चित्रीकरण करावे, हुरडा पार्टी सुरू असल्यास तसेच फार्म हाउस, रिसोर्ट सुरू असल्यास पोलीस कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बाधित रुग्णाला जर होम आयसोलेशन राहायचे असेल तर, घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंगल कार्यालयांनी आगामी लग्नाच्या बुकिंगची माहिती प्रशासनाला कळवावी. ५० पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने हमीपत्र द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्याने चिंता वाढवली, फक्त ५ दिवसांत करोना रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर
औरंगाबाद जिल्ह्यातही प्रशासनाने नवीन निर्बंध लागू केले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत बुधवारी ५० हून अधिकजण उपस्थित होते. पंचायत समितीच्या विलासराव देशमुख सभागृहात बैठक झाली. करोना नियमाचे पालन करण्यासाठी बैठकीच्या सुरवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश गटणे यांनी ज्या विभागाचे दोनपेक्षा अधिक प्रतिनिधी असतील त्यांनी सभागृहाबाहेर जावे असे सांगितले. त्यास प्रतिसाद देत दोन विभागाचे प्रतिनिधी सभागृहाबाहेर पडले. सभागृहात काही जणांनी मास्क घातलेले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘निम्म्या क्षमतेने केवळ ५ दिवस बँका सुरू ठेवा’

बँकांमध्ये काम करणारे अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित होऊ नयेत आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांपासून बँकेचे ग्राहक हे बाधित होऊ नयेत म्हणून ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या वतीने वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेत केवळ निम्मे मनुष्यबळ कार्यरत असावे, सर्वच बँका आठवड्याचे पाच दिवस दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवाव्यात, तसेच बँकांमधील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात यावा आदी सूचनांचा त्यात समावेश करण्यात यावा, असेही ‘यूएफबीयू’चे समन्वयक देविदास तुळजापूरकर यांच्या सहीनिशी बुधवारी (५ जानेवारी) काढण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग, राष्ट्रवादीकडून उमेदवारांचा शोध सुरूSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *