मोठी बातमी! ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


औरंगाबाद : राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत असताना, राज्य आणि स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेऊन तिसऱ्या लाटेला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती कार्यालय,आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य लिखित स्वरुपात देण्याच्या सूचना सुध्दा यावेळी देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल १०३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तर उद्यापासून शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे. तसेच शहरप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *