वाहन धारकांसाठी महत्त्वाची बातमी, जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी महागणार!


हिंगोली : वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी येत्या १ एप्रिल २०२२ पासून अमलात येणार आहे. जुने खाजगी, व्यवसायिक व्यापाऱ्यांच्या वाहनांची नोंदणी शुल्क, पुर्ननोंदणी शुल्क आणि फिटनेस नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. सिल्क वाढीमुळे जुन्या वाहनांचे काय करावे? असा प्रश्न जुने वाहने चालवत असलेल्या वाहनचालकांना सतावू लागला आहे. वाहन जुने असो अथवा नवे, त्याची नोंदणी आरटीओ कार्यालयात होणे आवश्यक आहे, असे आरटीओ कार्यालयाने सांगितले आहे.

स्क्रॅप पॉलिसी एक एप्रिल पासून अमलात येणार आहे. शासन जशी सूचना देईल त्याप्रमाणे पुढील सूचना वाहन चालकांना देण्यात येईल. कोरोना, ओमायक्रोनचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शारिरिक अंतर ठेवत वाहनांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.

त्याच बरोबर १ एप्रिलच्या अगोदर जुन्या वाहनधारकांनी वेळेवर नोंदणी करावी, असे आवाहन सुद्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. वेळेवर नोंदणी केली नाही तर दुचाकी वाहन चालकांना ३०० रुपये तर चार चाकी वाहन चालकांना ५०० रुपये दंड शासनाच्या नियमाप्रमाणे भरावे लागतील. यासाठी वाहनधारकांना दंड लागू द्यायचा नसेल तर आपल्या वाहनांची वेळेवर पुर्ननोंदणी करण्याचं आवाहन आरटीओ कार्यालयाने केलं आहे.

अशी असेल वाढ…

दुचाकी वाहनाची सध्याची शुल्क ६०० रूपये तर नवीन नोंदणी १००० रूपये.

चारचाकी सध्याची शुल्क ६०० रूपये तर नवीन नोंदणी ५००० रूपये.

पंधरा वर्षासाठी पुर्न नोंदणी शुल्क

रिक्षा ६००/२५००
मध्यम मालवाहू वाहनांसाठी योग्यता प्रमाणपत्र
१०००/१००००

जड मालवाहूसाठी योग्यता प्रमाणपत्र १५००/१२५०० रूपये असेल.

महागाईने अगोदरच कळस गाठलेला असताना त्यात जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी महागणार असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाचे दरवेळेस नियम वेगळेच असतात, महागाईमुळे नवीन दर परवडणारे नाहीत जुन्या वाहनांनी काय करायचे? असा प्रश्न सुद्धा नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *