पुणेकरांनो सावधान! रुग्ण वाढू लागताच पोलिसांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना


हायलाइट्स:

  • सार्वजनिक ठिकाणी लागू असलेल्या नियमांचं पालन करावं
  • नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणत दंडात्मक कारवाई
  • पोलीस सहआयुक्तांचा इशारा

पुणे : शहरात करोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी लागू असलेल्या नियमांचं पालन करावं. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. नियम न पाळणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलं आहे. (Pune Police Latest News)

‘शहरात नऊ दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या शंभरच्या घरात होती. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं. आपण सार्वजनिक ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर हे नियम पाळण्यामध्ये थोडे शिथील झालो होतो. पण, आता पुन्हा नियम कडक पाळण्याची वेळ आली आहे,’ असं रवींद्र शिसवे यांनी म्हटलं आहे.

चिंता वाढवणारी बातमी: मुंबईसह संपूर्ण राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

‘नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी न चुकता मास्क वापरावा. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांना शिस्त लागावी म्हणून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी दंडात्मक कारवाईची करण्याची वेळ येऊ देऊ नये. स्वतः हून नियम पाळावेत. त्या बरोबरच सुरक्षित अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. तसंच, सोबत नागरिकांनी छोटी सॅनिटायझरची बाटली ठेवून त्याचा वापर करणं आवश्यक आहे. हात सॅनिटाईज केल्यामुळे करोनाची साखळी तोडण्यात यश येईल,’ असंही पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले.

PM Modi Security: पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक: ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित केले आणि…

‘आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल’

रुग्णसंख्या वाढल्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यावरही पोलीस सहआयुक्तांनी भाष्य केलं आहे. ‘करोना रुग्णांची संख्या वाढल्यास त्याचा आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल. जे नागरिक इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. नागरिकांनी पहिली, दुसरी लाट तसंच गणेश उत्सव काळात प्रशासनाला नेहमी सहकार्य केलं आहे. यावेळी देखील सहकार्य करावं,’ असं आवाहन डॉ. शिसवे यांनी केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *