कोरोनाची धास्ती, औरंगाबादमध्ये नवा नियम, होम क्वारंन्टाईन व्हायचं असेल तर…


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आणि गृह विलगीकरणाबाबत जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आता कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला गृह विलगीकरणात राहायचे असेल तर, घरातील सर्व सदस्यांचे दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे.

काही वेळापूर्वी प्रशासन आणि खाजगी रुग्णालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जर एखांद्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, मात्र लक्षणे नसतील आणि त्याला गृह विलगीकरणात राहायचे असेल, तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे. सोबतच घरातील इतर सदस्यांनी होम क्वारंटाईन राहणे सुध्दा बंधनकारक असणार आहे.

बैठकीत घेतले गेले हे निर्णय…!

1) कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात (Home isolation) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक.

2) घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक (इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये)

3) गर्दीवर नियंत्रण ठेवा. हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. सभा/ कार्यक्रम हॉटेल/ रिसॉर्टमधील गर्दीचे चित्रीकरण करा

4) हुरडा पार्टीवर पूर्णपणे निर्बंध/ हुरडापार्टी सुरू असल्यास पोलीस कारवाई करणार.
(पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त)

5) शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी. सुरू दिसल्यास पोलीस कारवाई होणार (पोलीस अधीक्षक)

6) मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या बुकिंगची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने अंडर टेकिंग द्यावे लागणार. नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस कारवाई होणार. (पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक)

7) आजपर्यंत 1875 वाहन चालकांचे license रद्द केले यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार. कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही (संजय मैत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)

8) लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही

9) सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द

10) शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द..!

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढलेल्या पत्रकानुसार, जिल्ह्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती कार्यालय,आरोग्य कर्मचारी,उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवाबदाऱ्या आणि कर्तव्य लिखित स्वरूपात देण्याच्या सूचना सुध्दा यावेळी देण्यात आल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *