औरंगाबाद मनसेमध्ये पुन्हा गटबाजी, राज ठाकरेंनी पदावरुन दूर केलेला पदाधिकारी रुसला?


औरंगाबाद :मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मनसेच्या (Aurangabad MNS) जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केलेल्या माजी जिल्हाध्यक्ष आणि स्वतःला अजूनही मनसैनिक म्हणून घेणारे सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी आज झालेल्या मनसेच्या आंदोलनापासून दोन हात लांब राहणे पसंद केले. त्यामुळे दाशरथे अजून मनसेतच आहे का? अशी चर्चा आंदोलनास्थळी पाहायला मिळाली.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौर्‍यात सुहास दाशरथे यांचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्याने हा दौरा चांगलाच गाजला होता. पण आपलं पद काढले असले तरीही मी राज ठाकरेंचा सच्चा सैनिक असून, पुढेही कार्यकर्ता म्हणून मनसेचं काम करत राहील असे दाशरथे म्हणाले होते. पण आजच्या आंदोलनात त्याची अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली.

दाशरथे म्हणतात…

या सर्व प्रकाराबद्दल दशरथे यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता, ‘ मी आज शहरात नव्हतो, शहरात असतो तर नक्कीच आंदोलनात सहभागी झालो असतो. आंदोलनाची कोणतीही कल्पना मला देण्यात आली नव्हती, पण सोशल मीडियावर पाहण्यात आल्याने आम्ही जायला पाहिजे होतं,अशी प्रतिक्रिया दाशरथे यांनी दिली.

काय आहे प्रकरण…..?

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेत गटबाजी सुरु असल्याचे समोर आलं पण राज ठाकरे यांनी दशरथे यांचं पद काढून घेत सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्ष पद देत या गटबाजीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण पद काढून घेतल्यानंतरही दाशरथे यांनी आपण कार्यकर्ता म्हणून काम करू असा दावा केला होता. विशेष म्हणजे दाशरथे यांच्या गटातील अनेकांची काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *