गॅसच्या वाढत्या किंमतींनी सत्ता उलथली! ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा राजीनामाअल्माटी, :
देशात वाढत्या गॅसच्या किंमतींनी उडवून दिलेल्या हाहा:कारानं एका देशाच्या सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडलंय. ही घटना घडलीय तेल समृद्ध देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कझाकिस्तान या मध्य आशियाई देशात…

कझाकिस्तानात गॅसच्या वाढत्या किमतींवरून हिंसक सार्वजनिक निदर्शनं सुरू झाल्यानंतर सरकारनं राजीनामा सोपवला आहे. कझाकिस्तानचे यांनी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींकडून देशातील सर्वात मोठं शहर आणि पश्चिम मंगिस्टाऊ प्रांतात दोन आठवड्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. आणिबाणी नियमांतर्गत रात्री ११.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. एवढंच नाही तर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यासही बंदी जाहीर करण्यात आली आहे.

‘सरकार आणि लष्कराविरोधात हल्ला पुकारणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकार कोसळणार नाही पण आम्हाला परस्पर विश्वास आणि संवाद हवा आहे, वाद नको’ असं आवाहन राष्ट्रपतींनी कासेम झोमार्ट टोकायेव यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात केलं होतं. मात्र, राष्ट्रपती हे विधान करत असताना दुसरीकडे अल्माटीमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला तसंच ग्रेनेड सोडण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलकांना महापौर कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा पोलिसांनी कसोशीनं प्रयत्न केला.

अल्माटी ही कझाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. मंगळवारी इथं परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला दिसला.

या आंदोलनानंतर कझाकिस्तान सरकारनं आपला राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतींनी संविधानाच्या अनुच्छेद ७० नुसार हा राजीनामा स्वीकार केलाय.

अस्कार मामिन यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनी समायलोव अलीखान यांची देशाचे ‘काळजीवाहू पंतप्रधान’ म्हणून नियुक्ती केली आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान सरकारमधील सदस्य आपले काम करत राहतील, असं या आदेशात म्हटलं गेलंय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *