Artificial Sun: चीनच्या ‘कृत्रिम सूर्याचा’ ऊर्जा निर्मितीचा नवा रेकॉर्ड; जगाच्या चिंतेत भर!


हायलाइट्स:

  • चीनचा ऊर्जा निर्मिताचा यशस्वी प्रयोग
  • अणुभट्टीद्वारे ऊर्जा निर्मितीचा अनोखा प्रयोग
  • अमेरिका आणि ब्रिटनही याच मार्गावर

बीजिंग, चीन :

चीनच्या कृत्रिम सूर्यानं पुन्हा एकदा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. हेफेई स्थित ‘न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर’मधून १,०५६ सेकंद किंवा जवळपास १७ मिनिटांपर्यंत ७० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. दरम्यान, चीनच्या या बनावट सूर्यातून बाहेर पडणाऱ्या अफाट ऊर्जेमुळे जगाची चिंता मात्र वाढलीय.

चीनच्या या कृत्रिम सूर्यानं गेल्या ३० डिसेंबर रोजी एका विक्रमाची नोंद केली होती. एखाद्या अणुभट्टीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी याच कृत्रिम सूर्यातून १.२ कोटी अंश ऊर्जा उत्सर्जित झाली होती.

‘हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेस’कडून ‘एक्सपेरिमेन्टल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकामाक’ (EAST) हा हीटिंग सिस्टम प्रोजेक्ट सुरू केला आहे. इथं हायड्रोजनच्या साहाय्यानं हेलियम तयार करण्यात येतो. या दरम्यान मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.

पृथ्वीवरचा सूर्य : पृथ्वीवर इथे तयार होतेय सूर्याहून दुप्पट उष्णता
‘अॅस्ट्रॉईड नाही या तर एलियन्सनं पृथ्वीवर धाडलेल्या मिसाईल्स’
शुक्रवारी, ‘चायना अकादमी ऑफ सायन्सेस’चे संशोधक गोंग शियान्जू यांनी ७ कोटी अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जा निर्मितीची घोषणा केली. गोंग यांच्याच मार्गदर्शनाखाली हेफेईमध्ये हा प्रयोग सुरू आहे.

‘आम्ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत १०१ सेकंद १.२ कोटी अंश सेल्सिअस तापमान गाठलं होतं. यावेळेस हे प्लाझ्मा ऑपरेशन जवळपास १,०५६ सेकंद सुरू होतं. या दरम्यान तापमान ७ कोटी अंश सेल्सिअसच्या आसपास राहिलं. यामुळे फ्यूजनवर आधारित अणुभट्टी चालवण्यासाठी एक ठोस वैज्ञानिक आणि प्रायोगिक आधार निर्माण झाला आहे, असं गोंग यांनी चीनच्या अधिकृत संवाद समिती ‘शिन्हुआ’सोबत झालेल्या संभाषणादरम्यान म्हटलंय.

मानवाला ‘असीमित ऊर्जा’ मिळावी, यासाठी जगभरातील काही प्रगत देशांत अशाच प्रकारचं तंत्रज्ञान शोधून काढण्यासाठी संघर्ष सुरू आहे. चीनच्या या यशस्वी प्रयोगामुळे अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांनाही अशाच प्रकारच्या संशोधनासाठी सज्ज व्हावं लागलंय.

Doomsday Glacier: अंटार्टिकात हिमनदी फुटतेय; मुंबईच्या किनारी भागांनाही बसणार फटका?
Watch Video: एक्सप्रेस-वेवर गाड्यांशी स्पर्धा करणारा शहामृग कॅमेऱ्यात कैदSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *