अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ विधानाची दानवेंनी एका वाक्यात काढली हवा; म्हणाले…


हायलाइट्स:

  • सत्तार यांचं भाजप- शिवसेना युतीबाबत विधान
  • रावसाहेब दानवेंनी लगावला टोला
  • ‘गडकरींना खुश करण्यासाठी म्हणाले असतील’

औरंगाबादः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (nitin gadkari) पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी मंगळवारी केलं होतं. त्यांच्या याच विधानाची केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) एका वाक्यात हवा काढली. गडकरींनी खुश करण्यासाठी म्हणाले असतील, असा खोचक टोला दानवेंनी यावेळी लगावला.

दानवे यावेळी म्हणाले की, सत्तार यांचे ते विधान राजकीय आहे. गडकरी साहेबांकडून काही कामे काढून घ्यायची असतील म्हणून सत्तार असे म्हणाले असतील. सत्तार यांचं बोलणं मी काय कुणीच गांभीर्याने घेत नाही. आता रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा म्हणतात. त्यामुळे गडकरींकडे काही काम असेल आणि त्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी असे विधान सत्तार यांनी केले असावे. पण गडकरी हे मुरब्बी नेते आहेत, ते सत्तार यांचं विधान समजू शकतात,असा खोचक टोला दानवे यांनी सत्तार यांना लगावला.

वाचाः मित्राच्या मदतीने सख्ख्या भावाचा गळा आवळून केला खून; कारण ऐकून पोलीस सुद्धा चक्रावले

दिल्लीतील भेटीचे राज्यात पडसाद

अब्दुल सत्तार,रावसाहेब दानवे आणि नितीन गडकरी हे तिन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल ( मंगळवारी ) सत्तार यांनी गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर युतीसाठी गडकरींनी पुढाकार घेतल्यास युती होऊ शकते असे विधान केले. त्यानंतर आज पुन्हा दानवे यांच्या निवासस्थानी जात गळाभेट घेतली. त्यामुळे दिल्लीत या भेटींचे पडसाद राज्यातील राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे.

वाचाः जालन्यात चाललंय काय? सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांचा हैदोस, पोलिसांवरच चाकूने केला हल्ला

काय म्हणाले होते सत्तार…

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

वाचाः सत्तार यांना युतीवर बोलण्याचा अधिकार नाही; ‘या’ कट्टर शिवसेना नेत्याची टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *