Omicron Variant: करोनाची अंताकडे वाटचाल! ‘ओमिक्रॉन’च्या महालाटेत खुशखबर


हायलाइट्स:

  • जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धुमाकूळ
  • करोना महामारीचा अंताकडे प्रवास?
  • तज्ज्ञांचा भरवसा जगासाठी ठरतोय दिलासादायक

वॉशिंग्टन, अमेरिका :

जगभरात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातलेला असतानाच तज्ज्ञांकडून मात्र एक खुशखबर मिळालीय. जगभरात ‘ओमिक्रॉन’बाधित रुग्णांची संख्या तेजीनं वाढताना दिसून येत असली तरी रुग्णालयात दाखल करावं लागणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र किरकोळ असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना महामारी एक नवा परंतु, कमी चिंताजनक असा अध्याय सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारे आकडेही जगासाठी उत्साहजनक ठरत आहेत.

‘कॅलिफोर्निया विद्यापीठा’तील इम्युनोलॉजिस्ट मोनिका गांधी यांच्या म्हणण्यानुसार, ‘आपण आता पूर्णपणे वेगळ्या टप्प्यात आहोत. हा विषाणू भविष्यात नेहमीच आपल्यासोबत असेल परंतु, आम्हाला आशा आहे की ओमिक्रॉन व्हेरियंट रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करेल, ज्यामुळे या महामारीचा अंत होऊ शकेल’
Coronavirus in China: करोनाची धडकी; केवळ तीन रुग्ण आढळले आणि संपूर्ण शहर लॉकडाऊन!
Corona Home Test: ‘ओमिक्रॉन’ची चाचणी घरच्या घरी शक्य? पाहा, काय सांगतात तज्ज्ञ…
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ओमिक्रॉन प्रकाराच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या आठवड्यातील आकडेवारीवर नजर टाकली असता, व्यापक प्रतिकारशक्ती आणि विषाणूचं बदलतं स्वरुप अगोदरच्या तुलनेत कमी गंभीर स्वरुपाचं झालंय. दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासात असंही आढळून आलं की, ज्या रुग्णांना ओमिक्रॉन लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं ते डेल्टा लाटेदरम्यान दाखल झालेल्या रुग्णांपेक्षा ७३ टक्के कमी गंभीर स्वरुपाचे होते.

ओमिक्रॉनच्या संसर्गाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यानं अगोदर या व्हेरियंट संदर्भात चिंता वाढली होती. परंतु प्राथमिक आकडेवारीवरून, हा व्हेरियंट केवळ लसीकरण न झालेल्या लोकांनाच गाठत नाही तर ज्यांना यापूर्वी संसर्ग झाला आहे किंवा लसीकरण पूर्ण झालंय अशा व्यक्तींनाही सहज गाठत असल्याचं समोर आलं. मात्र, हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत मानवी फुफ्फुसांसाठी कमी धोकादायक असल्याचंही स्पष्ट झालंय.

भारतात तिसऱ्या लाटेचा संकेत

भारतात ओमिक्रॉनबाधितांची संख्या आतापर्यंत १८९२ झाली असून त्यापैंकी ७६६ जण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी दिलीय. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ५६८, दिल्लीत ३८२, केरळमध्ये १८५, राजस्थानात १७४, गुजरातमध्ये १५२, तर तमिळनाडूत १२१ ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत.

Watch Video: एक्सप्रेस-वेवर गाड्यांशी स्पर्धा करणारा शहामृग कॅमेऱ्यात कैद
Watch Video: हेलिकॉप्टर उडवण्याची ‘तालिबानी’ पद्धत पाहिलीत का?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *