डांबरीकरणाचे काम करणाऱ्या वाहनावर दुचाकी आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते जिंतूर रोडवर असलेल्या हत्ता नाईक फाट्यानजीक आज सायंकाळी उशिरा अपघात झाला आहे. एक दुचाकीस्वार रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या डांबरीकरणाचे काम करणाऱ्या मशीनवर भरधाव वेगाने जाऊन आदळला. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

मशीन रोडच्या कडेला अंधारात उभी असल्यामुळे तिचा अंदाज दुचाकीस्वराला आला नाही, त्यामुळे कदाचित हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून सेनगाव ते जिंतूर या मार्गाचे काम चालू आहे. मयत झालेल्या दुचाकीस्वारांची अद्याप ओळख पटली नसून, मात्र तो गंभीर रित्या जखमी झाला असून रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

यापूर्वीही रोड कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे चार जणांचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सदरील रोडचे काम सुरू असताना रोडवर दिशादर्शक फलक, त्याचबरोबर इतर कोणतेही सूचनाफलक नसल्याचे दिसून येते.

त्यामुळे हा रोड सध्या अपघाताला निमंत्रण देत असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु असून, अद्याप तरी या प्रकरणी पोलिसांत कुठलीही नोंद झाली नाहीये.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *