ईडीचा गंगाखेड शुगरला दणका, हिंगोलीतील ३९ हेक्टर जमीन सील


हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येडोबा परिसरात असलेल्या गंगाखेड शुगर अँड एजन्सीज लिमिटेड विजयनगर माखणी तर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावे असलेल्या ३९.३७ हेक्टर जमीन ईडीच्या पथकाने सील केली आहे.

कळमनुरीच्या तहसिलदार सुरेखा नांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बजावणी संचनलयाच्या पथकाने आज मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मदतीने सदरील जमीन सील केली आहे. आज ईडीचे ४ अधिकारी कळमनुरीच्या तहसील कार्यालयात दाखल झाले होते. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या सोबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले.

वाकोडी व खापरखेडा शिवारातील जमीन सील करायची आहे अशी माहिती दिली. त्यानंतर येडोबा परिसरात असलेल्या गंगाखेड शुगर अंड एजन्सिज लिमिटेड विजयनगर माखणी तर्फे मुख्य शेतकरी अधिकारि नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावे असलेली जमिन दाखवली आणि नंतर अधिकाऱ्यांनी जमिनीवर फलक लावत, जमिनीला सील लावले गंगाखेड शुगर अंड एजन्सीची वाकोडी येथिल सर्वे क्रमांक ९८ मधील १०.७३ हेक्टर, सर्वे क्रमांक ८६ मधील २.८४ हेक्टर, सर्वे क्रमांक ८७ मधील ७.९९ हेक्टर ,सर्वे क्रमांक १४२ मधील १४ हेक्टर, सर्वे क्रमांक १३७ मधील ३.८० हेक्टर जमीन आहे.

दरम्यान, वाकोडी शिवरातील २१.५७ हेक्टर आणि खापरखेडा शिवारातील १७.८० हेक्टर अशी एकूण ३९.३७ हेक्टर जमीन ईडीच्या पथकाने सील केली आहे. यावेळी महसूलचे मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *