उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पाळेमुळे रुजवणाऱ्या कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या


हायलाइट्स:

  • उस्मानाबादमध्ये शिवसैनिकाची आत्महत्या
  • गळफास लावून संपवली जीवनयात्रा
  • जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा केली होती स्थापन

उस्मानाबादः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रभावित होऊन उस्मानाबाद जिल्हयात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या दत्तात्रय नारायण वराडे वय-६५ या शिवसैनिकाने काल गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे दैवत समजून शिवसेनेसाठी निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उस्मानाबादेतील त्यांच्या घराशेजारील झाडाला भगव्याच्या सहाय्यानेच त्यांनी गळफास घेतला. (Osmanabad Shivsena)

३५ वर्षा पुर्वी उस्मानाबाद शहरातील विजय चौकात काही तरुण एकत्र आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने प्रभावित होऊन उस्मानाबाद जिल्हयातील पहिली शाखा विजय चौक येथे स्थापन झाली. पहिली शाखा स्थापन झाल्यानंतर या शाखेचे प्रमुख दत्तात्रय नारायण वराडे हे झाले. त्यावेळी वराडे हे उस्मानाबादमध्ये चहाची टपरी चालवत असतं. शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दत्तात्रय नारायण वराडे यांनी काही शिवसैनिकांना बरोबर घेवुन जिल्हयात फिरुन शिवसेनेची पाळेमुळे रुजवली होती.

वाचाः घरी सोडण्याच्या बहाण्याने ७० वर्षांच्या महिलेवर अतिप्रसंग, वृद्धाला अटक

आयुष्यभर शिवसेना शिवसेना आणि शिवसेनेसाठी सर्व काही म्हणणाऱ्या दत्तात्रय वराडे हे अत्यंत हलाखीचे दिवस जगत होते, असं बोललं जात आहे. उस्मानाबाद जिल्हयाने शिवसेनेला खुप काही दिले आहे. चार खासदार, तर आठ आमदार आत्तापर्यंत शिवसेनेला मिळालेले आहेत. नेते मागुन पुढे गेले मोठे झाले नावारुपास आले पण दत्तात्रय वराडे सारखे निष्ठावान कार्यकर्ते कायम उपेक्षित राहिले, अशी भावना त्यांच्या मृत्यूनंतर व्यक्त होत आहे.

वाचाः बहुचर्चित तुळजापुर गावठी पिस्तुल कनेक्शन पोहचले मध्य प्रदेशपर्यंत; समोर आली ‘ही’ माहितीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *