Ajit Pawar: राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उमेदवाराला बारामतीकरांची साथ; अजित पवारांना धक्का


हायलाइट्स:

  • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकाल जाहीर
  • जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, मात्र अजित पवारांना धक्का
  • राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले प्रदीप कंद विजयी

पुणे: जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा यश मिळवलं आहे. मात्र, सुरेश घुले यांच्या पराभवामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के यांचा पराभव केला आहे.

पुणे जिल्हा बँकेची निवडणूक एकूण २१ जागांवर झाली. त्यापैकी १४ जागा आधीच निवडून आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे २ व भाजपच्या एका संचालकाचा समावेश आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळं ही बँक पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार हे आधीच स्पष्ट झाले होते.

वाचा: रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी दोन बँकांचा प्रस्ताव, ठेवीदार म्हणतात…

उर्वरित सात जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यापैकी तीन जागांवर सुनील चांदेरे, अशोक पवार व विकास दांगट हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या १४ झाली आहे. तर, उर्वरित सात जणांमध्ये इतर पक्षांचे सदस्य आहेत.

वाचा: सलूनमध्ये नंबर लावण्यावरून दोन गटांत राडा, प्रकरण इतके चिघळले की…

विद्यमान संचालक सुरेश घुले यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी घुले यांचा पराभव केला आहे. घुले यांच्या विजयासाठी स्वत: अजित पवार मैदानात उतरले होते. कंद यांना जागा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. मात्र, त्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आलं आहे. कंद यांना ४०५ आणि घुले यांना ३९१ मते मिळाली. कंद यांना बारामतीमधूनच निर्णायक ५२ मते मिळाली आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *