omicron in maharashtra: राज्यात ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण; मुंबईत आहे अशी स्थिती!


हायलाइट्स:

  • राज्यात आज ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण आढळले.
  • यांपैकी सर्वांधिक रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले.
  • मुंबईत आढळलेल्या रुग्णांची संख्या ४० इतकी आहे.

मुंबई: राज्यात करोनाच्या (corona) वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली असताना आज ओमिक्रॉनच्या (omicron) रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. एकीकडे आज राज्यात १२ हजार १६० नव्या करोना रुग्णांचे निदान झालेले असतानाच, आज ओमिक्रॉनचे ६८ नवे रुग्ण आढळले आहेत. यांपैकी सर्वांधिक रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. मुंबईत आढळलेल्या रुग्णांची संख्या ४० इतकी आहे. (omicron in maharashtra latest update about 68 new omicron patients were found in the state today)

मुंबईनंतर पुणे महानगरपालिका क्षेत्रात १४, नागपूरमध्ये ४, पुणे ग्रामीण आणि पनवेल महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ३ आणि कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि साताऱ्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. याबरोबरच राज्यात आतापर्यंत एकूण ५७८ ओमिक्रॉन रुग्णांचे रिपोर्ट आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने होतेय वाढ; ‘अशी’ आहे ताजी स्थिती!

एकूण ५७८ ओमिक्रॉन रुग्णांपैकी मुंबईत आतापर्यंत ३६८ रुग्ण आढळले असून, पुणे मनपा क्षेत्रात ६३, पिंपरी चिंचवडमध्ये ३६, पुणे ग्रामीणमध्ये २६, ठाणे मनपात १३, पनवेलमध्ये ११, नागपूरमध्ये १०, नवी मुंबईत ९, कल्याण डोंबिवली आणि साताऱ्यात प्रत्येकी ७, उस्मानाबादमध्ये ५, वसई विरारमध्ये ४, नांदेडमध्ये ३, औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली आणि कोल्हापुरात प्रत्येकी २ आणि लातूर, अहमदनगर, अकोला आणि रायगडमद्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळलेला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘मोदीजी, ७०० शेतकऱ्यांचा तुमच्यामुळेच मृत्यू झाला’; नाना पटोलेंचा घणाघाती हल्ला

यांपैकी एकूण २६ रुग्ण हे इतर राज्यांमधील, तर ९ रुग्ण परदेशी नागरिक आहेत. तर रायगड, पालघर, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी १, तर ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- मोदीजी ‘अभी चीन की वाट लगाने वाले है’; ‘त्या’ व्हीडिओवरुन काँग्रेसचा मोदींना खोचक टोला

या रुग्णांपैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *