Kane Tanaka: जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेनं साजरा केला ११९ वा वाढदिवस


टोकियो, जपान :

जगातील सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेनं नुकताच आपला ११९ वा वाढदिवस साजरा केला आहे. जपानच्या फुकुओका प्रांतातील केन तनाका यांनी आपल्या वयाची ११८ वर्ष पूर्ण केलीत. यासाठी जगभरातून केन तनाका यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

केन तनाका यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, पहिले महायुद्ध सुरू होण्याच्या ११ वर्षांपूर्वी म्हणजे २ जानेवारी १९०३ रोजी केन यांचा जन्म झाला होता. केन यांना स्वत:ला आपल्या आयुष्याची १२० वर्ष पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

केन सध्या फुकुओका इथल्या एका नर्सिंग होममध्ये राहतात. वृद्धापकाळामुळे त्यांना आता बोलता येत नसलं तरी त्या नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांशी हातवारे करून संवाद साधतात.

‘द जपान टाईम्स’च्या वृत्तानुसार, केन तनाका यांना चॉकलेट आणि फिजी ड्रिंक्स आवडतात. टाइमपास करण्यासाठी त्यांना नंबर गेम खेळायलाही आवडतं. केन तनाका यांच्या जन्मानंतर केवळ वर्षभरातच रशिया-जपान युद्ध सुरू झालं. २०१९ मध्ये केन ११६ वर्षांच्या असताना त्यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड‘नं जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळख दिली.

US Russia: रशियानं हल्ला केला तर ‘निर्णायक’ कारवाई; बायडन यांच्याकडून युक्रेनला मदतीचं आश्वासन
Reham Khan: पंतप्रधान इम्रान खान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्यावर जीवघेणा हल्ला
२०२० मध्ये त्या ११७ वर्षे आणि २६१ दिवसांच्या जपानमधील सर्वात वृद्ध व्यक्ती बनल्या. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ वेबसाइटनुसार, तनाका यांनी १९२२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी आपल्या चुलत भावाशी विवाह केला होता. या जोडप्यानं एक नूडल्सचं दुकान चालवत आपला उदरनिर्वाह भागवला.

१९३७ मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या चीन-जपानी युद्धात केन यांचा पती आणि मोठा मुलगा यांनी भाग घेतला होता. वयाच्या ९० व्या वर्षी केन तनाका यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर वयाच्या १०३ व्या वर्षी त्यांच्यावर कोलोरेक्टल कॅन्सरची शस्त्रक्रियाही करण्यात आली.

‘द टाईम्स’नं गेल्या वर्षी दिलेल्या माहितीनुसार, २०२० पर्यंत केन तनाका यांना पाच नातवंडे आणि आठ पणतू आहेत. ‘मला आशा आहे की त्या पुढेही निरोगी राहतील आणि जसजसं वय वाढत जाईल तसतसं त्या आणखीन मजा घेत राहतील’ अशी प्रतिक्रिया केन तनाका ६२ वर्षीय नातू इजी यांनी ‘जपान टाईम्स’शी बोलताना व्यक्त केली.

यापूर्वीही काही लोकांना केन तनाका यांच्यापेक्षा वयानं मोठं असल्याचा दावा केला होता. गेल्या महिन्यात ‘चीनमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ तसंच आत्तापर्यंतची ‘सर्वात वृद्ध व्यक्ती’ अशी ओळख मिळवणाऱ्या व्यक्तीचंही १३५ वर्षी निधन झालंय.

Animal Rain: अवकाशातून माशांचा पाऊस, शास्त्रीय कारणही जाणून घ्या…
अरे बापरे! ब्राझिलमध्ये आढळली डायनासोरची ६ कोटी वर्षांपूर्वीची अंडीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *