जनजागृतीसाठी सहज हातातुन नेता येणारा स्पीकर सेट नगरसेवक परदेशी यांनी दिला भेट

जनजागृतीसाठी सहज हातातुन नेता येणारा स्पीकर सेट नगरसेवक परदेशी यांनी दिला भेट A hand-held speaker set for public awareness was given by Councilor vivek Pardeshi
कमी श्रमात,कमी खर्चात,जास्तीत जास्त भागात जोमाने राबणार जनजागृती मोहीम
 पंढरपूर - कोरोनामुक्त पंढरपूर अभियानासाठी व आरोग्य विषयक जनजागृतीसाठी सहज हातातुन नेता येणारा आहुजा या नामवंत कंपनीचा स्पिकर दुसऱ्या वेळी नगरसेवक विवेक परदेशी यांनी खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांचे शुभ हस्ते आरोग्य सभापती विक्रम शिरसट, यश नागेश भोसले,डॉ एकनाथ बोधले यांचे उपस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेस भेट दिला. 

   डिसेंबर महीन्यामध्ये कोरोमुक्त पंढरपूर अभियानासाठी शपथ घेण्यात आली होती. सदर अभियानासाठी विवेक परदेशी यांनी सहज हातातून नेता येणारा स्पिकर सेट भेट दिला होता. कोरोना दुसऱ्या लाटेत वाढते कोव्हीडचे रुग्ण व वाढते कंटेंनमेंट झोन पाहता अजून जास्त जोमाने जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरी हिवताप अधिकारी किरण मंजुळ यांनी अजून एक पोर्टेबल स्पिकर सेटची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेवक विवेक परदेशी यांनी सदर स्पिकर सेट तातडीने उपलब्ध करुन दिला. या दुसऱ्या लाटेच्या प्रसंगी पंढरपूरातील दानशुर व्यक्ती विविध माध्यमातून समाजसेवा करत असल्याने समाधान वाटत असल्याचे श्री परदेशी यांनी सांगितले. 

    या स्पिकरच्या मदतीने कमी श्रमात, कमी खर्चात,जास्तीत जास्त भागात जनजागृती मोहीम राबवता येणार तसेच पंढरपूर शहरामध्ये आणि विशेषतः ज्या भागात रिक्षा जात नाही अशा गल्लीबोळामध्ये जनजागृती करता येईल. यावेळी श्री परदेशी यांनी सर्व कर्मचारी यांना कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम ३० औषधे दिली.

    कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये पूर्ण पंढरपूरात शहरात वरचेवर जनजागृती करण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती विक्रम शिरसट यांनी सांगितले .

  युवानेते प्रणव परिचारक यांनी स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल नगरसेवक विवेक परदेशी यांचे आभार मानले व लवकरात लवकर या कोरोनाच्या महामारीपासून आपली सुटका व्हावी व आपले जनजीवन सुरळीत व्हावी अशी पांडुरंग चरणी प्राथना केली व सर्व नागरिकांना कोरोना संदर्भातील शासनाचे सुचना पाळण्या संदर्भात आवाहन केले.

    या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर,आरोग्य सभापती विक्रम शिरसट, हिवताप अधिकारी किरण मंजुळ, यश नागेश भोसले, धर्मराज घोडके, सौदागर डोके,पांडुरंग डोके,वैभव डोके,राहुल लिंगे,बापु डोपे,मिलींद येळे,प्रितम कुलकर्णी,आनंद कासट,विकी राऊळ, अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: