एसटी संपावर तोडगा कधी निघणार?, हवालदिल एसटी प्रवाशांची शासन-आंदोलकांकडून अपेक्षा


नागपूर : नवीन वर्ष सुरू झाले तरी एसटी कर्मचारी संपावरच असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबण्याची चिन्हे नाहीत. रोज खासगी वाहनांनी प्रवास करून प्रवासीही आता कंटाळले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ व प्रशासन या दोहोंनीही फार न ताणता यातून मार्ग काढावा, अशी अपेक्षा प्रवाशांतर्फे व्यक्त येत आहे.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी २०२१मध्ये सुरू झालेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नव्या वर्षात पोहोचले. मात्र, संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक प्रयत्न केल्यानंतरही संपकरी कामावर परण्यास तयार नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनाचे आर्थिक नुकसान तर होत आहेत, शिवाय प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना खासगी वानचालकांना दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. सुरक्षित प्रवासाची हमी नसली तरी पर्याय नसल्याने सामान्य प्रवाशांवर दुप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे.

सर्दी-खोकल्याच्या साथीमुळे करोना चाचणीही पॉझिटिव्ह, ‘या’ जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढली
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ६ डिसेंबरपासून प्रवासी वाहतूक सुरू केली. दोन बसेसपासून सुरू झालेली प्रवासी वाहतूक १८ बसगाड्यांपर्यंत पोहोचली. दरम्यान प्रशासनाने निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केल्यानंतर गेल्या १० दिवसांत केवळ ४३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शनिवारी केवळ एक कर्मचारी कामावर परतल्याने संख्या ४३वर पोहोचली आहे. यात चालक ९, वाहक १५, चालक कम वाहक ८, यांत्रिक ६, लिपिक १, वाहतूक नियंत्रक २, वरिष्ठ लिपिक १ आणि स्वच्छक १, असे एकूण ४३ कर्मचारी आहेत.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाeऱ्यांनी संप पुकारला आहे. नागपूर विभागातील २ हजार ४९२ कर्मचाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ ७०० कर्मचारी कामावर हजर आहेत. जवळपास १ हजार ८०० कर्मचारी संपावर असून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, काही बसगाड्या आणि प्रवासी वाहतूक सुरू आहे. रविवारी विभागात १९ बसेसनी ६२ फेऱ्या केल्या. या गाड्यांनी ३ हजार ७१६ किमी प्रवास केला.

पोलीस पुत्राने विद्यार्थिनीची ‘आयटम’ म्हणून काढली छेड; मुलीने शिकवला ‘असा’ धडा…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *