रावसाहेब दानवेंचा दौरा औरंगाबादकरांसाठी डोकेदुखी, ट्रॅफिक जाम; रुग्णवाहिका अडकली!


मोसिन शेख, औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा येथे एका खासगी उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दानवे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच फटाके लावून आतिषबाजी केली तसेच दानवेंच्या ताफ्यामुळे जालना रोडवरील चिकलठाणा येथे अर्धा तास ट्रॅफिक जाम होतं.

जालना रोडवरील चिकलठाणा येथे एका भाजप नेत्याच्या खाजगी पतसंस्थेचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते होणार होतं. त्यामुळे दानवे हे जालन्याहून औरंगाबादकडे जाताना चिकलठाणा येथे संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान दाखल झाले. मात्र यावेळी कार्यकर्त्यांकडून दानवेंच्या स्वागतासाठी थेट जालनारोडवरच फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच दानवेंच्या ताफ्यातील गाड्या रळस्त्यावरच थांबल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. विशेष म्हणजे या ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिकासुद्धा अडकली होती.

तब्बल अर्धा तास ट्रॅफिक जाम….

दानवे उद्घाटनासाठी आले असता त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी होती. तर यावेळी दानवे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्याही मुख्य रस्त्यावरच थांबल्या. त्यामुळे तब्बल अर्धा तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम होती. तर यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप पाहायला मिळाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *