Aurangabad Corona Update : औरंगाबादेत सहाव्या दिवशी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर


औरंगाबाद : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना, औरंगाबादची आकडेवारी सुद्धा धडकी भरवणारी ठरत आहे. गेल्या पाच दिवसांपासून वाढत असलेली आकडेवारी सहाव्या दिवशीसुद्धा आणखी वाढताना पाहायला मिळाली. रविवारी जिल्ह्यात एकूण ३५ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज (रविवारी) दिवसभरात एकूण ३५ रुग्णांची भर पडली आहे. ज्यात मनपा हद्दीत २८ तर ग्रामीण भागातील ०७ रुग्णांचा समावेश आहे. तर आज एकूण २३ जणांना सुट्टी देण्यात आली असून, ८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे वाढती कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे.

तर कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यनंतर औरंगाबादची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासूनची आकडेवारी पुन्हा एकदा वाढतांना पाहायला मिळत आहे. २८ डिसेंबरला जिल्ह्यात ०९ रुग्णांची भर पडली, २९ डिसेंबरला वाढून रूग्ण संख्या १६ झाली, ३० डिसेंबरला पुन्हा १६ रुग्ण आढळून आले. ३१ डिसेंबरला वाढून १८ रुग्ण आढळून आले. तर १ जानेवारीला हा आकडा २६ वर गेला आहे. तर आज हाच आकडा ३५ वर गेला आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली असताना ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. आज राज्यात ११ हजार ८७७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे, राज्यात पहिल्यांदाच ओमिक्रॉनचे ५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. पुण्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या ३६ इतकी आहे तर उर्वरित राज्यात १४ ओमिक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *