गरोदर मातांना सरकारी रुग्णालयांशिवाय पर्याय नाही, कारण खाजगी रुग्णालयातील….


विकास दळवी, हिंगोली : कोरोनाच्या काळात मा. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयात दिली जाणारी मोफत प्रसूती सुविधा नवीन वर्षात बंद करण्यात आली आहे. यापुढे मोफत प्रसूतीसाठी पात्र लाभधारकांनाmaternity facilities, private hospitals, pregnant mothers, government hospital, Mahatma Fule Aarogya yojna, महात्मा फुले आरोग्य योजना, सरकारी रुग्णालय, खाजगी रुग्णालय शासकीय रुग्णालयातच जावे लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती बाळगणाऱ्या शासनाने गरोदर मातांना पुन्हा सरकारी रुग्णालयांची वाट दाखवली आहे.

मागील वर्षात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना २० डिसेंबर रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत निर्णय घेतला होता. याकाळात शासकीय रुग्णालयावर कोरोनाच्या रुग्णांचा भार असल्यामुळे खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. त्या रुग्णालयांना पात्र लाभार्थींना मोफत बाळंतपणाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सुविधेचा चा कालावधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता.

ही मुदत संपली असल्यामुळे एक जानेवारीपासून शासकिय योजना मंजूर असलेल्या रुग्णालयांनी योजने अंतर्गत प्रसूतीची प्रकरणे घेऊ नये. अशी सूचना ३१ डिसेंबर रोजी मित्राने मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ही योजना सुरू राहणार आहे.

शासन एकीकडे ओमायक्रॉनच्या भीतीपोटी रोज नवनवे निर्बंध घालत आहे. सर्व शासकीय यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत आहे. दुसरीकडे आर्थिक दुर्बल घटकांसाठी खासगी रुग्णालयांत मिळणारी मोफत प्रसूतीची योजना बंद केली जात आहे. भविष्यात खरोखर कोरोना ची तिसरी लाट आली तर शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा कोरोना पीडितांनी भरण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा गरोदर माता व कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात जावे लागेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *