ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांचा निकाल लावणार; किरीट सोमय्यांनी घेतली ‘या’ नेत्यांची नावे


हायलाइट्स:

  • भाजप नेते किरीट सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारला आव्हान
  • घोटाळेबाज नेत्यांचा निकाल लावणार, नववर्षाचा केला संकल्प
  • सोमय्या यांनी थेट अजित पवारांसह या नेत्यांची घेतली नावे
  • घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करण्याचा सोडला संकल्प

मुंबई: घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार, असा संकल्प सोमय्या यांनी नववर्षानिमित्त केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, २०२२ मधील संकल्प काय असेल हे ट्विट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. माफिया सेना मुक्त मुंबई महापालिका करणार आणि घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करणार असल्याचा संकल्प करत त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेते, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचा निकाल लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि मंत्र्यांची थेट नावे घेतली. परिवहन मंत्री अनिल परब, भावना गवळी, आनंद अडसूळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक आणि अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला.

समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचे पुन्हा गंभीर आरोप; ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली!
VIDEO:मिस्टर अँड मिसेस फडणवीसांकडून नववर्षाच्या शुभेच्छा, व्हीडिओ पाहिलात का?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. करोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक रेकॉर्ड केला, असं ते म्हणाले होते. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करत, आणखी काही मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.

‘फर्जीवाडा’विरोधात लढा सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा नववर्षात नवा संकल्प
मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना नववर्षाची भेट, 500 चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *