… म्हणून साखरपुड्यातच उरकला जातोय विवाह सोहळा


हायलाइट्स:

  • वाढत्या ओमिक्रॉन संसर्गामुळं वाढला धोका
  • कार्यक्रमांवर येणार निर्बंध
  • साखरपुड्यातच शुभमंगल सावधान!

औरंगाबादः ओमिक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूने जगासह देशाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संभाव्य करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धास्तीने आगामी काळात होणारे लग्न आताच साखरपुड्यातच उरकण्याचा ग्रामीण भागातील लोकांनी धडाकाच लावला आहे.

महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत असल्याने राज्य सरकारने निर्बंध आणखी कठोर केले आहेत. त्यानुसार विवाह सोहळ्यांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल. त्यामुळे मोठा खर्च करून ५० लोकांमध्ये लग्न करण्यापेक्षा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित साखरपुड्यातच लग्न उरकण्याचे प्रमाण गेल्या आठवड्याभरात ग्रामीण भागात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर शहरात सुद्धा काही प्रमाणात असे कार्यक्रम पार पडत आहे.

वाचाः
एसटी संपाचा टपाल व्यवस्थेवरही होतोय मोठा परिणाम; जाणून घ्या नेमकं कारण

पुढील काही काळात आणखी कठोर निर्बंध लावले जाणार आल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात लग्न समारंभावर बंदी आली किंवा ५० पेक्षाही कमी लोकात कार्यक्रम साजरे करण्याचे आदेश काढल्यास लग्न कसे लावणार? असा प्रश्न वधू-वराच्या कुटुंबातील लोकांना पडला आहे. त्यामुळे त्यापूर्वीच सद्या ५० लोकांमध्येच साखरपुड्यात लग्न उरकून घेण्याचे प्रमाण वाढत आहे.

वाचाः ३१ डिसेंबरला सुरू होता बारमध्ये धक्कादायक प्रकार; पोलिसांनी केली धडक कारवाई

आधीच मुली मिळेना…

आपलं लग्न यादगार राहावे असे सर्वानाच वाटते, म्हणून लग्न धुमधडाक्यात करण्याचं अनेकांच स्वप्न असते. पण सद्याची परिस्थिती पाहता आणखी किती दिवस निर्बंध कायम राहतील याचा अंदाज नाही. त्यात एवढ्या काळासाठी मुलीकडेच्या लोकांना थांबवून ठेवणंही अवघड असते. तर लग्न लवकर उरकून घेण्याचा सूर मुलीकडच्या लोकांचा असतो, त्यामुळे मुलीकडच्या लोकांना नाराज करता येत नसल्याने लग्न साखरपुड्यातच उरकले जात आहे.

वाचाः पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत म्हणतात…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *