US China: ‘निकारागुआ’त चीननं उभारला दूतावास, अमेरिका-तैवानला झटका


हायलाइट्स:

  • अमेरिका आणि तैवानला चीनकडून जोरदार झटका
  • १९९० नंतर निकारागुआमध्ये पहिल्यांदाच उभारला दूतावास
  • निकारागुआतील तैवानच्या इमारतीचं काय होणार?

मनागुआ, निकारागुआ :

अमेरिका आणि तैवानच्या नाकावर टिच्चून चीननं निकारागुआत आपलं दूतावास उघडलंय. उल्लेखनीय म्हणजे, १९९० नंतर पहिल्यांदाच चीननं निकारागुआ देशात आपला दूतावास सुरू केला आहे. निकारागुआचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांच्या सरकारनं तैवानशी संबंध तोडल्यानंतर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आलंय.

उभय देशांमध्ये एक प्रकारची ‘वैचारिक आत्मीयता’ असल्याचं सांगतानाच परराष्ट्र मंत्री डेनिस मोनकाडा यांनी चीनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसंच करोना व्हायरस संक्रमण विरोधी लस ‘सिनोफॉर्म’चे १० लाख डोस उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी चीनचे आभार मानले.

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून निकारागुआचा चीनला पाठिंबा, तैवानशी तोडले संबंध
डॅनियल ऑर्टेगा सरकारनं १९८५ मध्ये चीनशी संबंध प्रस्थापित केले, परंतु १९९० मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत या सरकारचा पराभव झाला. त्यानंतर, देशाचे नवीन अध्यक्ष विलेटा कॅमारो यांच्या सरकारनं तैवानला मान्यता दिली. निकारागुआच्या सरकारनं ९ डिसेंबर रोजी तैवानशी संबंध तोडले. चीनशी हातमिळवणी करत आणि तैवानची मान्यता रद्द करत निकारागुआनं तैवानचे दूतावास बंद केले.

Arunachal Pradesh: १५ ठिकाणांची नावं बदलून ‘अरुणालचल’वर दावा ठोकाणाऱ्या चीनला भारतानं ठणकावलं!
India China: अरुणाचलच्या १५ भागांना ‘चिनी’ नावं घोषित, नेमका काय आहे चीनचा कुटील डाव?
Hong Kong: हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक मीडियावर चीनकडून कारवाई, देशद्रोहाचे गुन्हे दाखल
तैवानच्या इमारतीचं काय होणार?

चीननं आपलं नवीन दूतावास वेगळ्या ठिकाणी उभारलं आहे. मात्र, निकारागुआतील तैवानच्या इमारतीचं काय होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तैवानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळण्यापूर्वी ही संपत्ती मॅनाग्वाच्या ‘रोमन कॅथोलिक आर्कडिओसीस’ला दान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अशा प्रकारची कोणतीही देणगी बेकायदेशीर असेल असं डॅनियल ऑर्टेगा सरकारनं म्हटलं.

यावर, तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘ऑर्टेगा शासनाच्या गंभीर अवैध कारवायांची निंदा’ करण्यात आली. निकारागुआ सरकारनं तैवानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यासाठी केवळ दोन आठवड्यांची मुदत देऊन मानक प्रक्रियेचे उल्लंघन केल्याची खंत तैवाननं व्यक्त केली.

गेल्या अनेक दशकांपासून तैवानशी राजनैतिक संबंध असलेल्या देशांना आपल्या पक्षात वळवण्यासाठी चीनी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याच साखळीत चीननं पनामा, एल साल्वाडोर आणि डोमिनिकन रिपब्लिकन यांना आपल्या गोटात दाखल केलंय.

गनी म्हणतात, ‘सकाळी माहीत नव्हतं की दुपारपर्यंत अफगाणिस्तान सोडावं लागेल’
Afghan Crisis: यादवीत होरपळणाऱ्या अफगाणिस्तानासाठी भारत-पाकचे एक पाऊल पुढे
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात स्वत: भूकेलेल्या आई-बापांवर पोटच्या पोरांना विकायची वेळ!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *